!! श्री भास्करगिरी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे !!
संस्थेच्या माध्यमातून पाठांतर गायन वादन व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा गुरुवर्य व विद्यार्थी गुणगौरव सोहळा या अंतर्गत प्रतिवर्षी घेतला जातो.
A) जे विद्यार्थी श्रीज्ञानेश्वरी, श्री संत तुकाराम महाराजांची गाथा, भजनी मालिका, श्रीमद्भगवद्गीता इत्यादींचे पाठांतर करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण पोशाख भेटवस्तू व रोख रक्कम देऊन सन्मानित केले जाते.
B) दरवर्षीच्या समाधी सोहळ्याच्या अगोदर श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा स्वच्छता मंडळ देवगड यांच्या माध्यमातून यात्रेनिमित्त आळंदी मध्ये स्वच्छता अभियान राबविला जातो.
C) आळंदी मध्ये वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जातात.
D) यावर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा त्रीदिनात्मक आहे. कार्यक्रमातून यामध्ये काकडा, ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण (18 अध्याय), परमपूज्य गुरुवर्य डॉ. नारायण महाराज जाधव यांचे ताटीच्या अभंगावरती चिंतन, हरिपाठ व किर्तन असे आयोजन आहे. सदर कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे.
E) श्रीक्षेत्र प्रवरासंगम येथे संस्थेच्या माध्यमातून श्री संत साध्वी पुंजाई माता यांचा पुण्यतिथी सोहळा पौष महिन्यात घेतला जातो.
F) संस्थेच्या माध्यमातून आळंदी आणि परिसरामध्ये संस्कृत भारती या संस्थेच्या सहाय्याने विविध संस्कृत संभाषणाचे वर्ग आयोजित केले जातात.
GET IN TOUCH
Have You Any Queries? Contact Us Now.
Phone Numbers:
Phone: +91 9890150175 | +91 90751 26173
Address Location:
देवगड आश्रम, ज्ञानदेवीनगर गल्ली नंबर 1, नगरपरिषद शाळा क्रमांक 4च्या मागे, चरोली रोड, आळंदीदेवाची, ता. खेड, जि. पुणे 412105.